नांदेड ग्रामीण पोलिसांची वाळू घाटावर धाड, अवैध वाळू उपसा प्रकरणात १.25 कोटींचा मुद्देमाल जप्त
नांदेड, 20 मे (हिं.स.)। नांदेड तालुक्यातील इंजेगाव व बोंढार येथील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करताना ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असून घटनास्थळावरून १ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एक आयचर टेम्पो, क्रेन, बोट यांचा समावेश असू
नांदेड ग्रामीण पोलिसांची वाळू घाटावर धाड, अवैध वाळू उपसा प्रकरणात १.25 कोटींचा मुद्देमाल जप्त


नांदेड, 20 मे (हिं.स.)।

नांदेड तालुक्यातील इंजेगाव व बोंढार येथील

गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करताना ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असून घटनास्थळावरून १ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एक आयचर टेम्पो, क्रेन, बोट यांचा समावेश असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व त्यांचे सहकारी गस्त घालत होते. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, नांदेड तालुक्यातील इंजेगाव व बोंढार येथील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांनी तातडीने इंजेगाव येथे जाऊन धाड टाकली असता काही जण अवैध वाळू उपसा करत आहेत. तसेच

बोंढार येथे काही जण अवैध वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून घटनास्थळावरुन एक आयचर टेम्पो, क्रेन, बोट, २० तराफे, ६ इंजिन व वाळू असा १ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गवेंद्र सिरमलवार यांच्या तक्रारीवरून माधव मोतीराम जाधव, हिदोळा ता लोहा, इंद्रजितसिंग केसरसिंग सोखी नांदेड, शेख अजीम शेख सलीम नांदेड, पिंटू पाटील तिडके यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande