
परभणी, 20 मे (हिं.स.)।
डिजिटल रणांगण जिंकायचं असेल, तर तंत्रज्ञानाचीही तलवार धारदार हवी, असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, परभणी जिल्हा अभ्यासवर्गात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ‘सोशल मीडिया’चे बदलते सामर्थ्य, नमो ॲप, सरल ॲप आणि एआय टूल्सचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
आज भारतीय जनता पक्षाची विचारधारा केवळ सभांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने ती घराघरात पोहोचत आहे. हा विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड किती महत्त्वाची आहे, यावर यावेळी विशेष भर दिला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाला जनसंपर्क आणि सुशासनाचे प्रभावी माध्यम बनवले, तर महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी विकास आणि डिजिटल व्यवस्थापनाची नवी दिशा राज्याला दिली, हे यावेळी अधोरेखित केले.
भाजपाचा कार्यकर्ता हा आता केवळ बूथपुरता मर्यादित नसून सोशल मीडियावरही विचारांचा सक्षम योद्धा बनला पाहिजे. डिजिटल युगात वेगवान माहिती, प्रभावी संवाद आणि एआयच्या सहाय्याने विकासाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, हीच काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सक्षम झालेला भाजपा कार्यकर्ता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक जागरूक, सक्रिय आणि प्रभावी होत आहे. विचारांचा विस्तार आणि संघटनाची ताकद वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमे हीच पुढील निर्णायक रणनीती ठरणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis