देशव्यापी केमिस्ट बंदला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, 20 मे (हिं.स.)। अखिल भारतीय केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशन यांच्या वतीने 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला सेलू शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये सेलू तालुक्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिकांनी सक
देशव्यापी केमिस्ट बंदला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, 20 मे (हिं.स.)।

अखिल भारतीय केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशन यांच्या वतीने 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला सेलू शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये सेलू तालुक्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला.

सर्व केमिस्ट सदस्य एकत्र येत शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर तसेच सेलू येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात केमिस्ट असोसिएशन सेलू तालुका अध्यक्ष संदीप टाक, सचिव केदार गजमल, कैलास काळे, गणेश साडेगावकर, लक्ष्मण पौळ, शिवनारायण मालानी, जयप्रकाश झंवर, प्रकाश कदम यांच्यासह सेलू तालुक्यातील बहुसंख्य केमिस्ट सदस्य उपस्थित होते.

देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर सेलू शहरातील बहुतांश औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरात बंदला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande