छ.संभाजीनगर - मोबाईल टॉवर्सकडून नियमानुसार कर वसूल करण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक संपन्न झाली. समिती सभा कार्यक्रम पत्रिका क्रमांक ५ अन्वये आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील मालमत्
Q


छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक संपन्न झाली. समिती सभा कार्यक्रम पत्रिका क्रमांक ५ अन्वये आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

शहरातील मालमत्ता कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकी तसेच कराच्या कक्षेबाहेर राहिलेल्या मालमत्तांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. करातून सुटलेल्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ कर आकारणीच्या कक्षेत आणावे, मोठ्या थकबाकीदारांकडून प्राधान्याने वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच शहरातील सर्व मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण करून कर आकारणीत कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

याशिवाय शहरातील मोबाईल टॉवर्सकडून नियमानुसार कर वसूल करण्यात यावा तसेच महानगरपालिका हद्दीतील एकूण मालमत्तांची अचूक संख्या निश्चित करून त्यानुसार कर आकारणी करण्यात यावी, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने कर विभागाने अधिक प्रभावी नियोजन करून वसुली वाढवावी, यावर बैठकीत भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande