रत्नागिरी : विभा अरविंद वाचनालयाचे चिपळूणला रविवारी उद्धाटन
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या विभा अरविंद ग्रंथालयाचे उद्घाटन रविवारी (दि. २४ मे) रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम चिपळूणच्या खेंड भागातील स्प्रिंग क्लिनिकच्या तळमजल्य
रत्नागिरी : विभा अरविंद वाचनालयाचे चिपळूणला रविवारी उद्धाटन


रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या विभा अरविंद ग्रंथालयाचे उद्घाटन रविवारी (दि. २४ मे) रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम चिपळूणच्या खेंड भागातील स्प्रिंग क्लिनिकच्या तळमजल्यावर (जेड गार्डन, स्वरविहार, गणपती मंदिराशेजारी) पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे भूषविणार असून, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. 'आपलं चिपळूण'चे कार्याध्यक्ष संतोष देशमुख, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, घरडा उद्योग समूहाचे आर. सी. कुलकर्णी, वक्ते व प्रवचनकार धनंजय चितळे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत उपस्थित राहणार आहेत.

विभा अरविंद ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामांकित लेखकांची पुस्तके वाचनप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः विद्यार्थी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश काणे, कार्यवाह विजय कदम, कोषाध्यक्ष विनायक ओक आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande