विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गारवा; मंदिर समितीचा पुढाकार
सोलापूर, 20 मे (हिं.स.)। पंढरपूर आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनासह विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरही होत आहे. तासन्तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून
Vithal


सोलापूर, 20 मे (हिं.स.)।

पंढरपूर आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनासह विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरही होत आहे. तासन्तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शन रांगेत ठराविक ठिकाणी स्प्रिंकलर अर्थात तुषार फवारणी यंत्रणा बसविण्यात आली आहे.या सुविधेमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठा गारवा मिळत असून, विशेषतः अधिक मासानिमित्त पंढरपुरात वाढलेल्या गर्दीतून भाविक समाधान व्यक्त करत आहेत.दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्याश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या अधिक मास सुरू असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे उन्हाचा तडाखाही वाढत असल्याने दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी मंदिर समितीने विशेष उपाययोजना केल्या आहेत.मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande