सोलापूर-टेंभुर्णीत भीषण आगीमध्ये ४ ते ५ दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान
सोलापूर, 20 मे (हिं.स.) : टेंभुर्णी येथील करमाळा रोड परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागून ४ ते ५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत महेश हार्डवेअर, तोडकर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, विश्वकर्मा फर्निचर तसेच माऊली फर्निचर अँड स्लाय
gfd


सोलापूर, 20 मे (हिं.स.) : टेंभुर्णी येथील करमाळा रोड परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागून ४ ते ५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत महेश हार्डवेअर, तोडकर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, विश्वकर्मा फर्निचर तसेच माऊली फर्निचर अँड स्लायडिंग या दुकानांमधील कोट्यवधी रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

राजेंद्र लक्ष्मण बोंगाणे यांच्या बंद असलेल्या ‘माऊली फर्निचर’ दुकानाच्या मागील बाजूने मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. दुकानामागे साठवून ठेवलेल्या फर्निचरच्या कचऱ्याने प्रथम पेट घेतल्याचे सांगितले जात आहे.स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत शेजारील आकाश सुतार यांच्या ‘विश्वकर्मा फर्निचर’ दुकानापर्यंत पोहोचली.परिसरातील काही तरुणांनी धाडस दाखवत शेजारील हार्डवेअर दुकानाच्या छतावर चढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि आगीची तीव्रता वाढल्याने त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या.या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर, इलेक्ट्रिकल साहित्य आणि अन्य माल जळून खाक झाला असून नुकसान कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande