ठाण्यात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा लाटणे मोर्चा
ठाणे, 21 मे (हिं.स.)। वाढती महागाई आणि महिलांवरील अत्याचार याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेवरून तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली महिलाध्यक्षा मनिषा भगत या
ठाण्यात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा लाटणे मोर्चा


ठाणे, 21 मे (हिं.स.)। वाढती महागाई आणि महिलांवरील अत्याचार याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेवरून तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली महिलाध्यक्षा मनिषा भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 22) लाटणे मोर्चा काढण्यात येणार आहे.

बंगालच्या निवडणुकीनंतर इंधनाचे दर वाढू लागले आहेत. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला असून स्वयंपाकघर चालविणे महिलांसाठी जिकीरीचे झाले आहे. या सर्व महागाईला पंतप्रधान मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक 22 मे रोजी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे मनिषा भगत यांनी सांगितले. या मोर्चात केंद्र सरकारला जाग यावी अन् गोरगरीबांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचावा, यासाठी पोळीपाट- थाळीनाद करण्यात येणार असल्याचेही मनिषा भगत यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande