जळगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन महिलांसह एक पुरुष ताब्यात
जळगाव, 22 मे (हिं.स.) शहरातील निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या’ पथकाने ही मो
जळगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन महिलांसह एक पुरुष ताब्यात


जळगाव, 22 मे (हिं.स.) शहरातील निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या’ पथकाने ही मोठी कारवाई केली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ महिला आणि १ पुरुषाला ताब्यात घेतले आहे.निमखेडी रोड परिसरातील ब्रह्मांड नायक अपार्टमेंटमधील एका रहिवासी सदनिकेत (फ्लॅट) वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे आणि सावधगिरीने या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सापळा रचला. ठरलेल्या योजनेनुसार, पोलिसांनी प्रथम एका बनावट ग्राहकाला (पंटर) संबंधित फ्लॅटमध्ये पाठवले. पंटरने आत जाऊन पैशांची बोलणी केली आणि तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पंटरने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाला मोबाईलवर ‘मिस कॉल’ देऊन इशारा केला. पंटरचा इशारा मिळताच, अपार्टमेंटबाहेर तैनात असलेल्या एएचटीयूच्या पथकाने तात्काळ आत धाव घेत त्या ठिकाणी अचानक छापा टाकला आणि हे रॅकेट रंगेहात पकडले. शहरात रहिवासी भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्याविरुद्धची ही मोठी कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी डीवायएसपी श्री प्रशांत दरेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश बडगुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, नीलिमा हिवराळे,अनिल पाटील, पोलीस हवालदार विजय पाटील, भूषण कोल्हे, महिला पोलीस हवालदार वहिदा तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.सध्या याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचा हात आहे आणि याचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जळगावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे पुरते धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande