
बीड, 25 मे (हिं.स.)।
गंगाखेडकडून परळीकडे येणाऱ्या ऑटोरिक्षाला मोठ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षाचालक ठार झाला. गंगाखेड ते परळी रस्त्यावरील निळा फाट्याजवळ असलेल्या जिनिंगजवळ ही घटना घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथील ऑटोचालक युवक परमेश्वर विठ्ठल कर्ते (वय ३७) हे प्रवासी भाडे घेऊन गंगाखेडकडे गेले होते. गंगाखेड येथून परळीकडे परत येताना गंगाखेड-परळी रस्त्यावर या ऑटोची मोठ्या वाहनाला धडक झाली. यात ऑटोचे नुकसान झाले. ऑटो चालक परमेश्वर कर्ते गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी पडला होता. परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. परमेश्वर याच्या अपघाताची बातमी कळताच साळुंकवाडी व परळी परिसरातील त्याचे परिचित यांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मयत परमेश्वर कर्ते हा घरचा कर्ता होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis