शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
बागलाण, 25 मे (हिं.स.)। - सातत्याने कांदा व इतर शेतमालाचे भाव घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. यामुळे आता चांगलीच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून सर्वे सुरू करण्यात आली आहे अवकाळी पाऊस आणि कांद्याचे घसरते बाजारभाव
Farmer commits suicide


बागलाण, 25 मे (हिं.स.)।

- सातत्याने कांदा व इतर शेतमालाचे भाव घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. यामुळे आता चांगलीच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून सर्वे सुरू करण्यात आली आहे

अवकाळी पाऊस आणि कांद्याचे घसरते बाजारभाव, तिन्ही मुलांचे विवाह कसे होतील ही विवंचना आणि घेतलेले कर्ज फेडण्याचा ताण यामुळे बागलाण तालुक्यातील राहूड येथील शेतकरी गुलाब केशव निकम (वय 59) यांनी गावाशेजारी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, 3 मुले आहेत. त्यांची 3 एकर शेती होती. शनिवारी जनावरांना चारा टाकण्यासाठी ते खळ्यात गेले रात्री शेतातच झोपले. सकाळी घरी न परतल्याने मुलगा चेतन खळ्याकडे गेला असता, ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे राहूड गावामध्ये सुकाळा पसरली आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पीक चांगले आले तरी अचानक पाऊस येऊन कोसळतो. किंवा उत्पन्न केलेल्या मालाला भावच मिळत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande