
परभणी, 25 मे (हिं.स.)।
जागतिक पातळीवरील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दहा दिवसात चौथ्यांदा मोठी वाढ केली.15 मे रोजी इंधनात 3 रुपये वाढ करण्यात आली होती. 19 मे रोजी 90 पैसे तर 23 मे रोजीही 90 पैशांनी वाढ करण्यात आली. त्या पाठोपाठ अवघ्या दोन दिवसात म्हणजे आज 25 मे रोजी पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैसे व डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांनी वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसात चौथ्यांदा दरवाढ झाल्याने सर्वसामान्य वाहनधारक अक्षरशः हैराण झाला आहे. आधीच या जिल्ह्यात इंधनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. त्यातच केलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे. तसेच महागाईसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढणार, असे स्पष्ट संकेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis