जळगावात मोकाट कुत्र्याने घेतला तरुणाचा बळी
जळगाव, 25 मे (हिं.स.) काही दिवसापूर्वी भुसावळात कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी ९ वर्षीय बालकाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता जळगाव शहरातही ३० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पिंप्राळा-हुडको परिसरात महिनाभरापूर्वी एका पिसा
जळगावात मोकाट कुत्र्याने घेतला तरुणाचा बळी


जळगाव, 25 मे (हिं.स.) काही दिवसापूर्वी भुसावळात कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी ९ वर्षीय बालकाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता जळगाव शहरातही ३० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पिंप्राळा-हुडको परिसरात महिनाभरापूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रेबीजमुळे अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. शेख ताहेर शेख फारुख (वय ३०, रा. पिंप्राळा-हुडको, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जळगावकरांमध्ये प्रचंड भीती व महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.मृत शेख ताहेर हा तरुण हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घराजवळ अचानक एका मोकाट कुत्र्याने शेख ताहेरसह परिसरातील इतर सात ते आठ जणांवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने ताहेरच्या हाताचे अक्षरशः लचके तोडले होते.हल्ल्यानंतर ताहेरने तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन अँटी-रेबीज लस (ARV) घेतली होती. मात्र, डॉक्टरांच्या मते त्याची जखम अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने लसीसोबतच रेबीजचे विशेष सिरम घेणे अत्यंत गरजेचे होते. दुर्दैवाने ते सिरम वेळेत घेतले गेले नाही. महिना उलटत आला असताना, २१ मे रोजी अचानक ताहेरची प्रकृती खालावली आणि त्याला रेबीजची स्पष्ट लक्षणे दिसू लागली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande