परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक : पहिल्या दिवशी १९ अर्जांची विक्री; दाखल संख्या निरंक
परभणी, 25 मे (हिं.स.)। विधान परिषदेची परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक-२०२६ प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ९ जणांनी एकूण १९ उमेदवारी अर्ज घेतले. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.निवडणूक कार्यक्रमानुसार
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक : पहिल्या दिवशी १९ अर्जांची विक्री; दाखल संख्या निरंक


परभणी, 25 मे (हिं.स.)।

विधान परिषदेची परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक-२०२६ प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ९ जणांनी एकूण १९ उमेदवारी अर्ज घेतले. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ आहे. अर्जांची छाननी २ जून रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान होणार आहे. तर मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande