पाटोदा तालुक्यात टंचाईनुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
बीड, 25 मे (हिं.स.)। पाटोदा तालुक्यात १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, पेट्रोलपंपांवर सकाळपासूनच दुचाकी-चारचाकी वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. एकाच वेळी डझनभर दुचाकीस्वार इंधनासाठी ताटकळत उभे आहेत. तालुक्याला सांगल
पाटोदा तालुक्यात टंचाईनुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा


बीड, 25 मे (हिं.स.)।

पाटोदा तालुक्यात

१५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, पेट्रोलपंपांवर सकाळपासूनच दुचाकी-चारचाकी वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. एकाच वेळी डझनभर दुचाकीस्वार इंधनासाठी ताटकळत उभे आहेत.

तालुक्याला सांगली जिल्ह्यातील मिरज डेपोतून इंधनाचा पुरवठा होतो. परंतु मागील काही दिवसांपासून मिरज डेपोतून येणारा पुरवठा निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे पाटोदा शहर व पाटोदा ग्रामीण भागामध्ये टंचाई निर्माण झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी उधारीवरील इंधन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. पंपचालकांनी आगाऊकमी प्रमाणात इंधन द्यावे लागते. आमच्याकडे वरूनच पेट्रोल, डिझेल साठा कमी येत आहे. त्यामुळे कमी प्रमाणात द्यावे लागते, असे सांगितले.

पंपावरील साठा संपला की पुढचा टँकर येईपर्यंत पंप बंद ठेवावा लागतो. सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सकाळी ६ वाजता रांगेत लागले तरी ९ वाजता पेट्रोल संपते.

'मिरज डेपोतून पुरेसा आणि वेळेवर पुरवठा व्हावा. उधारीची मर्यादा वाढवावी, नाहीतर टंचाई कायम राहील' अशी मागणी पाटोदा तालुका पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केली आहे. नागरिकांनी घाबरून जास्त इंधन साठवू नये.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande