सोलापुरात ढग-उन्हाचा खेळ; तापमान पुन्हा चाळिशीकडे
सोलापूर, 25 मे (हिं.स.)। मे महिना संपत आला तरी सोलापूरकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शनिवारी दिवसभर 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे काही काळ उकाड्यापासून दिला
temp Solparu


सोलापूर, 25 मे (हिं.स.)।

मे महिना संपत आला तरी सोलापूरकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शनिवारी दिवसभर 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रविवारी पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवला. शहरात 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली रविवारी सायंकाळपासून सोमवार पहाटेपर्यंत सोलापूर शहर आणि परिसरात भाग बदलून पाऊस झाला. सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी 12 वाजेपर्यंत ढग आणि उन्हाचा खेळ सुरू होता. मात्र त्यानंतर तापमानात वाढ होऊन पुन्हा उष्णतेची तीव्रता जाणवू लागली.

दरम्यान, हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा सुमारे 12 टक्के कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच 17 मे ते 15 जून या कालावधीत अधिक मास असल्यानेही पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande