
छत्रपती संभाजीनगर, 25 मे (हिं.स.)।जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सादर केलेल्या कामकाजावर मुख्य निवडणूक आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान,मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षणाच्या कामात कसूर करणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या बीएलओंवर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुक संदर्भातील मतदार संख्या, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी,निवडणूक समित्या आदींची माहिती सादर केली.तसेच एसआयआर मॅपिंगसाठी बीएलओंच्या नियुक्त्या,त्यांचे प्रशिक्षण,राजकीय पक्षांसोबत झालेल्या बैठका,बीएलए नियुक्ती,झालेले मॅपिंग आणि आतापर्यंतची कार्यवाही याचा तपशील त्यांनी मांडला.
सन २००२ मध्ये जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ होते,मात्र सध्या चार विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात असल्याचे श्री पुजार यांनी निदर्शनास आणून दिले.जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आणि मॅपिंग पूर्ण झालेल्या मतदारांची आकडेवारीही त्यांनी सादर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis