अमरावतीत अवकाळी वादळाचा कहर; झाड कोसळून गायीचा मृत्यू, दोन जनावरे जखमी
अमरावती, 25 मे (हिं.स.) तळेगाव ठाकूर परिसरात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह जोरदार वादळाने मोठे नुकसान घडवून आणले. या नैसर्गिक आपत्तीत झाड कोसळून एका गायीचा मृत्यू झाला, तर दोन गायी गंभीर जखमी झाल्याची घटना मौजा तिवसा भाग २ येथे घडली.
अवकाळी वादळाचा कहर; झाड कोसळून गायीचा मृत्यू, दोन जनावरे जखमी


अमरावती, 25 मे (हिं.स.)

तळेगाव ठाकूर परिसरात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह जोरदार वादळाने मोठे नुकसान घडवून आणले. या नैसर्गिक आपत्तीत झाड कोसळून एका गायीचा मृत्यू झाला, तर दोन गायी गंभीर जखमी झाल्याची घटना मौजा तिवसा भाग २ येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी उत्तमराव उमप यांच्या शेताजवळ असलेले सुमारे २० वर्षे जुने मुंगणाचे झाड दुपारी दोन वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अचानक कोसळले. त्याचवेळी त्या ठिकाणावरून काही गायी जात होत्या. अचानक झाड अंगावर पडल्याने राजू शेंडे यांच्या गायीचा जागीच मृत्यू झाला. तर मारोती निमकर आणि दीपक भारती यांच्या गायी गंभीर जखमी झाल्या.घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी झाडाच्या फांद्या हटवून जखमी गायींना बाहेर काढले. त्यानंतर बंडीच्या सहाय्याने जनावरांना गावात आणण्यात आले. जखमी गायींवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल माहुरे यांनी तातडीने उपचार केले.दरम्यान, घटनेनंतर तलाठी तेजस्विनी केवटे आणि महसूल सेवक बाळू घुरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे संबंधित पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande