
बीड, 31 मे (हिं.स.)। गेवराई येथे जन्म घेणाऱ्या मुलींच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादीकडून पाच हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करण्यात येत असून मागील गेल्या तीन वर्षांपासून नवजात लाडक्या लेकींचा असाही सन्मान करण्याचे स्तुत्य काम राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष संदिप मडके आणि र.भ. अट्टल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्ता पिसाळ करत आहेत.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून
राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष संदिप मडके आणि र.भ. अट्टल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्ता पिसाळ यांच्यावतीने बुधवार, ३१ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे जन्मलेल्या मुलींच्या आईच्या नावे पाच हजार रुपये शिवशारदा मल्टीस्टेट, गेवराई येथे फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी हा उपक्रम राबविला असून हे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत ३७ महिलांना यांचा लाभदेण्यात आला आहे. स्त्रीभ्रूण हत्या आणि कमी झालेला मुलींचा जन्मदर या बाबी लक्षात घेता या उपक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis