रेल्वेच्या धडकेत चार गुरांचा मृत्यू
अकोला, 02 जून (हिं.स.)। अकोल्यातील सायखेड शिवारातील अकोला-पूर्णा ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर लोहगड रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत चार गुरांचा मृत्यू झाला, तर दोन गाई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.प्राप्त माहितीनुसार, लोहगड रेल्वे स्थानकापासू
Photo


अकोला, 02 जून (हिं.स.)। अकोल्यातील सायखेड शिवारातील अकोला-पूर्णा ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर लोहगड रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत चार गुरांचा मृत्यू झाला, तर दोन गाई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.प्राप्त माहितीनुसार, लोहगड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर सायखेड शिवारात रेल्वे रुळांवरून गुरांचा कळप जात असताना ही घटना घडली. या अपघातात चार गुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गाई गंभीर जखमी झाल्या. सायखेड व चोहोगाव परिसरातील अनेक गुरे चारा व पाण्याच्या शोधात फिरत असून, अशाच प्रकारे फिरत असताना ही गुरे रेल्वे रुळांवर आली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande