
अकोला, 02 जून (हिं.स.)।श्री भगवंतप्राप्ती गोसेवा धाम, अकोला येथे विश्व हिन्दू परिषद , गो अनुसंधान केंद्र देवलापार नागपूर, शामसुंदर गौरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निशुल्क गोमय श्री गणेश मूर्ती निर्माण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
कार्यशाळेमध्ये गो अनुसंधान केंद्र, देवलापार येथील प्रशिक्षकांनी देशी गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती तयार करण्याचे सविस्तर प्रशिक्षण दिले. श्री गणेश भक्त, गोभक्त तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांचा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षकांनी मार्गदर्शनासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींनी स्वतःच्या हाताने श्री गणेश मूर्ती तयार करून कार्यशाळेचा आनंद घेतला.कार्यक्रमाची सुरुवात गोमाता, गजानन महाराज, बजरंगबली आणि भोलेनाथ यांच्या पूजनाने करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रांत गोरक्षा प्रमुख अतुलजी अयाचित, मुख्य प्रशिक्षक नितीन मालवी, प्रा. एन. के. राठी, योगाचार्य भगवंतराव गावंडे व पत्रकार विनय टोले उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आनंद गोयेंका, पुरुषोत्तम धानोरकर, सदाशिव लांडे,प्रा.वंदना शिंगणे, सुरेश कुलकर्णी, राजेश टिकार, प्रा. एस. बी. गावंडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोमय गणेश मूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात अतुल अयाचित यांनी पर्यावरणपूरक गोमय श्री गणेश मूर्ती स्थापनेचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे गोसेवा, पर्यावरण संरक्षण तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास गजानन चतरकार, जी. एस. पाटील, अविभाऊ गावंडे, एम. पी. गावंडे, सुरेश उगले, प्रफुल्ल टिकार, राजेश अग्रवाल, शैलेश चौखंडे, धनराज हरणे, अंकित रोकडे, ओमसाई गावंडे, गोपाल डायकर, अतुल राठोड, प्रसाद उमरेकर, अर्णव बोरसे भजनी मंडळातील महिला स्नेहलता टिकार, कुमुदिनी गावंडे,आशा निमजे,रुक्मिणी मोघाड,रेखा राठोड,चित्रा गावंडे,प्राप्ती गावंडे मानस डायकर,शकुंतला अंबाडकर,आशा कांबळे,आरुष गावंडे, ख़ुशी टिकार,शिवांश राऊत,संगीता शर्मा, माही गावंडे, युक्ता गावंडे,मृणाल ठाकरे,अनुष्का चौखंडे, राणी उमरेकर, अंशुल, चौखंडे,श्रेयश अकोते,सार्थक टिकार,,रुद्र नळे,सुनील इंगळे, युगंधर गावंडे,संतोष रत्नपारखी, ओमप्रकाश काळबांडे,यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे