
चंद्रपूर, 31 मे (हिं.स.)। ताडोबा बफर मधील पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान रविवारी बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. ताडोबाच्या बफर मधील पळसगाव वनपरिक्षेत्रातील पिपर्डा नियत क्षेत्रात वाघिणीचा बछडा मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव