चंद्रपूर : सिंदेवाही वनक्षेत्रात विहिरीत पडून वाघाचा मृत्यू
चंद्रपूर, 31 मे (हिं.स.)। ब्रह्मपुरी वनविभागाच्या सिंदेवाही वनक्षेत्रातील डुंगरगाव नियत क्षेत्रामध्ये असलेल्या एका विहिरीत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. हजारीचक चारगाव बागडे येथील शेतकरी पांडुरंग गजभिये यांच्या शेतातील विहिर
चंद्रपूर : सिंदेवाही वनक्षेत्रात विहिरीत पडून वाघाचा मृत्यू


चंद्रपूर, 31 मे (हिं.स.)। ब्रह्मपुरी वनविभागाच्या सिंदेवाही वनक्षेत्रातील डुंगरगाव नियत क्षेत्रामध्ये असलेल्या एका विहिरीत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली.

हजारीचक चारगाव बागडे येथील शेतकरी पांडुरंग गजभिये यांच्या शेतातील विहिरीतून शेतकऱ्याला दुर्गंधी आली. तेव्हा विहिरीत एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्यांनी या प्रकरणाची माहिती सिंदेवाही वनविभागाला दिली. याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. वाघाचे शवविच्छेदन केले गेले. शिकारीच्या नादात वाघ कठडे नसलेल्या विहिरीत पडला असल्याची शक्यता असून त्याचे वय सात वर्षाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande