
चंद्रपूर, 31 मे (हिं.स.)। तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील रहिवासी असलेला गुराखी दिलीप नन्नावरे (५०) हा नजीकच्या तळोधी जंगलात आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव