
नांदेड, 31 मे (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलूर येथे नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
देगलूर शहराच्या नगराध्यक्ष सौ. विजयमालाताई बालाजीराव टेकाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर नगरपालिकेच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर आणि पक्षीय नियोजनावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. शिवराज पाटील होटाळकर, देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. बालाजीराव टेकाळे, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. हनुमंतराव देसाई आणि माजी नगराध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पदमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक श्री. संतोष नारलावार, नगरसेवक श्री. दिगंबर कौरवार, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. अनिकेत पाटील राजूरकर, तालुकाध्यक्ष श्री. शिवाजीराव कनकंटे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेवक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis