डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकपदी डॉ.सुभाष चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 31 मे (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राच्या विद्यापीठ ग्रंथालय संचालकपदी डॉ.सुभाष पुंडलिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन दशकांपासून ग्रंथालयशास्त्र संशोधन, अध्यापक का
अ


छत्रपती संभाजीनगर, 31 मे (हिं.स.)।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राच्या विद्यापीठ ग्रंथालय संचालकपदी डॉ.सुभाष पुंडलिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन दशकांपासून ग्रंथालयशास्त्र संशोधन, अध्यापक कार्य करणा-या डॉ.चव्हाण यांनी पदभार घेतला.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने डॉ.सुभाष चव्हाण यांची निवड केली. मुंबई येथील एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठात ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक म्हणून ते कार्यरत होते. डॉ.वैशाली खापर्डे यांच्याकडून डॉ.चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. तीन वर्षांपूर्वी डॉ. धर्मराज वीर हे पूर्णवेळ संचालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यापासून या पदावर प्रभारी संचालक कार्यरत होते.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.डॉ.चव्हाण यापूर्वी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक तसेच ग्रंथालयशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. ग्रंथालय क्षेत्रातील त्यांना २८ वर्षांचा समृद्ध अनुभव असून त्यामध्ये १८ वर्षे महाविद्यालयीन ग्रंथपाल म्हणून तर जवळपास १० वर्षे विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली असून मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्ससह मराठी आणि इतिहास विषयातील एम.ए. पदव्या प्राप्त केल्या आहेत. शैक्षणिक प्रशासनाबरोबरच संशोधन क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ पीएच.डी. संशोधक तसेच २८ एम.फिल. विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या संशोधन पूर्ण केले आहे. डॉ.चव्हाण यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १२० संशोधन निबंध प्रकाशित केले असून १७ पुस्तके प्रकाशित व संपादित केली आहेत. मुंबई विज्ञान ग्रंथालय महासंघघाचे (Bombay Science Librarians Association) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषद व सिनेटचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. याशिवाय ग्रंथालयशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विविध विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.एसएनडीटी महिला विद्यापीठातील अनेक महत्वपूर्ण समित्यांवर त्यांनी काम केले आहे. तसेच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत इंग्रजी-हिंदी-मराठी ग्रंथालय व माहितीशास्त्र शब्दकोश निर्मिती समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अनेक समित्यावर काम केले आहे.त्यांच्या कार्यकाळात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकन मध्ये ज्ञान स्रोत केंद्राला १०० टक्के गुण प्राप्त झाले तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाला देशातील सर्वोत्तम विभाग म्हणून पुरस्कार प्राप्त झाला.त्यांनी आतापर्यंत ११ देशाला भेटी दिल्या आहे. त्यांचा हा अनुभव या विद्यापीठासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

* मे महिन्यात सहा संवैधानिक अधिकारी रुजु*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अस्थापनेवर मे महिन्यात प्रकुलगुरुंसह एकुण सहा संवैधानिक अधिकारी रुजू झाले आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने विविध संवैधानिक अधिका-यांची नियुक्ती केली. यामध्ये आजिवन व शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या संचालकपदी डॉ.अश्विन रांजणीकर हे रुजू झाले. तर अधिष्ठाता म्हणून डॉ.भास्कर साठे (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), डॉ.वैशाली खापर्डे (आंतरविद्या शाखा), संचालक, डॉ.हिंमत जाधव (इन्क्यूबूशन, लिंकेजस) तसेच ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक पदी डॉ.सुभाष चव्हाण रुजू झाले. अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली. झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर डॉ.प्रवीण वक्ते यांची प्रकुलगुरु म्हणून निवड करण्यात आली. अधिष्ठातांची दोन पदे, कुलसचिवपदासाठी मात्र कोणही उमेदवार पात्र ठरला नाही. त्यामुळे ही पदे रिक्त राहीली आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande