
परभणी, 31 मे (हिं.स.) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आज रविवारी रोजी महानगरपालिकेच्या वतीने नियोजित पुतळ्याच्या जागेवर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर, सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम, अल्केश देशमुख, मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव, भांडरपाल रामेश्वर कुलकर्णी, अग्निशमन विभाग प्रमुख दीपक कानोडे, मनोज तळेकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा, राजाभाउ मोरे, शेख हारून, रंगनाथ गरुड आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान महानगरपालिकेच्या नियोजित पुतळा परिसरात रविवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख माजी उपमहापौर भगवान वाघमारे, डॉ.विवेक नावंदर, तुकाराम साठे, गट नेते गुलमीर खान, किर्तीकुमार बुरांडे, माजी सभापती सुनिल देशमुख आदीनी प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis