
परभणी, 01 जून (हिं.स.)।
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 इच्छुकांनी 10 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघातून सुशीलकुमार सुरेशराव देशमुख यांनी दोन, विवेक पांडुरंग नावंदर यांनी शिवसेना उबाठा गटाकडून दोन तर सईद खान शेरगुल खान पठाण यांनी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त मेहराज खान शेरगुल खान पठाण, विजय रावसाहेब जामकर, विश्वजित मनोहर बुधवंत व संग्राम जामकर यांनी प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis