अकोला जिल्हा नियोजन समितीची सभा ५ जूनला
अकोला, 01 जून (हिं.स.)।राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची सभा दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवन येथे आयोजिण्यात आली आहे.सभेच्या विषयसूचीनुसार गत सभेचे इतिवृत्तवाचन व अनुपालन, ज
अकोला जिल्हा नियोजन समितीची सभा ५ जूनला


अकोला, 01 जून (हिं.स.)।राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची सभा दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवन येथे आयोजिण्यात आली आहे.सभेच्या विषयसूचीनुसार गत सभेचे इतिवृत्तवाचन व अनुपालन, जिल्हा वार्षिक योजनेत- सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना यांच्या २०२५-२६ च्या खर्चास मान्यता देणे, सन २०२६-२७ या वर्षाचा नियोजन आढावा आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande