भाजपाचे शिंदे सेनेला आव्हान मिळण्याची शक्यता, मविआची माघार
नाशिक, 01 जून (हिं.स.)। - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे त्यामुळे आत ही निवडणूक बिनविरोध होणार की महायुतीमध्येच अंतर्गत लढाई होणार याकडे सर्वांचे ल
BJPs-Shinde-Sena-likely


नाशिक, 01 जून (हिं.स.)।

- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे त्यामुळे आत ही निवडणूक बिनविरोध होणार की महायुतीमध्येच अंतर्गत लढाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजपने अजून पर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे सर्वांचेच लक्ष भाजपाच्या भूमिकेकडे लागलेले आहे.

नाशिक मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची एक जून ही शेवटची तारीख होती तोपर्यंत चांगल्याच राजकीय घडामोडी या निवडणुकीच्या निमित्याने नाशिक जिल्ह्यात घडले आहे. सुरुवातीला या मतदारसंघांमध्ये भाजप आणि महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाने सांगितलेला दावा हा एकमेकांच्या शहपतिशहा मध्ये बदलला होता. हे सर्व घडत असताना ज्यावेळी प्रत्यक्ष जागावाटप झाली त्यावेळी नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाल्यानंतर त्यांनी याच मतदारसंघातील निवृत्त झालेले आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी घेऊन त्यांनी आपली उमेदवारी घोषित केले त्यांनी एक जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी नरेंद्र दराडे यांच्याबरोबरच जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे, आमदार सुहास कांदे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हे सर्व घडत असताना ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्याच वेळी दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क नेते मिलिंद मिर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधान परिषदेची निवडणूक लढविणार नसल्याचे घोषित केले या ठिकाणी त्यांनी दराडे यांनी केलेला घोडेबाजार असलेली त्यांची आत्तापर्यंतची कथा ही सांगितली आणि अशा माणसाविरोधात निवडणूक लढविण्यापेक्षा निवडणूक न लढविलेली बरी असे सांगून त्यांनी या मतदारसंघातून माघार घेत असल्याचे सांगितले त्यामुळे या मतदारसंघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्यावतीने माजी आमदार वसंत गीते यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज आला आता उद्याचे माघारी घेणार आहेत तर अडीच ही जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडली होती त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या वतीने या मतदारसंघातून कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहेत.

हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र भाजपने आपले पत्ते उघड केलेले नाही भाजपचे वतीने या मतदारसंघातून आतापर्यंत उपाध्यक्ष निलेश बोरा , ज्येष्ठ नगरसेवक गणेश गीते, हे दोन गिरीश महाजन समर्थक तर यांच्यासह अजून दोन मातकबरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे भाजपची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली असली तरीही माघारीची मुदत अजून तीन दिवस आहे त्यानंतर भाजप काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे भाजपने सुरुवातीपासूनच या मतदारसंघावरची दाबा सांगितलेला होता त्यामुळे आता या मतदारसंघांमध्ये भाजपा आणि महायुतीच्या घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होते की भाजप शेवटच्या क्षणी थांबून घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे भाजपची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे अजूनही शिवसेना शिंदे पक्ष समोर अडचणींचा सामना कायम आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande