रत्नागिरी : डंपरला कारची धडक, एक ठार, चौघे जखमी
रत्नागिरी, 1 जून (हिं.स.) : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील निवेबुद्रुक येथे आज सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून आलेल्या वॅगनआर कारने जोरदार धडक दिली. या घटनेत एका नमन कलाकाराचा मृत्यू झ
कारची अंबरला धडक


रत्नागिरी, 1 जून (हिं.स.) : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील निवेबुद्रुक येथे आज सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून आलेल्या वॅगनआर कारने जोरदार धडक दिली. या घटनेत एका नमन कलाकाराचा मृत्यू झाला. अन्य चारजण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून हे सर्व कलाकार पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारने (क्र. एमएच-०२-जेपी-९४९३) निवळीच्या दिशेने प्रवास करत होते. निवेबुद्रुक परिसरात आले असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर (क्र. एमएच-०८-जी-१५५९) पाठीमागून प्रचंड वेगाने आदळली. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला.अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर आणि संतोष सांडिम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमध्ये आणि डंपरखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका सेवेचे चालक मनोज पांचाळ यांनी सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मृत्यू झालेल्या नमन कलाकाराची ओळख अद्याप पटलेली नाही. रुग्णालयात दाखल इतर जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची नोंद करून देवरुख पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande