चंद्रपूर : भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती अरुण लखाणी यांनी दाखल केला नामांकन अर्ज.
चंद्रपूर, 01 जून (हिं.स.)।महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी
चंद्रपूर : भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती अरुण लखाणी यांनी दाखल केला नामांकन अर्ज.


चंद्रपूर, 01 जून (हिं.स.)।महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज सादर केला.नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अरुण लखाणी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला.

यावेळी राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख ना. पंकज भोयर, पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर, पदवीधर निवडणूक नोंदणीचे सहप्रमुख सुधीर दिघे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार किर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार समीर कुणावार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, आमदार मिलिंद नरोटे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार अशोक नेते, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सुदर्शन निमकर, देवराव होळी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, महापौर संगीता खांडेकर आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित नेत्यांनी अरुण लखाणी यांच्या उमेदवारीबाबत विश्वास व्यक्त करत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी आणि मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी अरुण लखाणी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असे मतही अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande