डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार मुख्यमंत्री आणि दोन्ह उपमुख्यमंत्री
डोंबिवली, 01 जून (हिं.स.)। श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराची जागा संदर्भात सरकारने निर्णय घेतल्यानंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब नुकतेच डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती पूजन केलं. दर
Ph1


डोंबिवली, 01 जून (हिं.स.)।

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराची जागा संदर्भात सरकारने निर्णय घेतल्यानंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब नुकतेच डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती पूजन केलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंडळातील अनेक मंत्री आठ जून रोजी श्री पिंपळेश्वर मंदिरात महादेवाच दर्शन घेण्यासाठी येणार असून त्यादिवशी कीर्तन, महापूजाचा आयोजन केले आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगीतले.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिरभूमीची अनेक वर्षांची लढाई अखेर यशस्वी ठरली आहे. पिंपळेश्वर मंदिर हा डोंबिवलीकर ग्रामस्थांच्या वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा विषय आहे. मंदिराच्या जागेसाठीचा संघर्ष गेली १४ वर्षे सातत्याने सुरू होता असेही शेवटी रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande