विधान परिषद निवडणूकः कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे छ. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, 01 जून (हिं.स.)औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा
विधान परिषद निवडणूकः कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे छ. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


छत्रपती संभाजीनगर, 01 जून (हिं.स.)औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जारी केले आहेत. या आदेशात त्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी करावयाच्या कारवाईबाबत निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेशात दिलेले निर्देश याप्रमाणे- निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात, सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयात, ईव्हीएम स्ट्रॉंग रुम, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र येथे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून २४X७ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे. अरुंद रस्ते, गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवणे, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक यांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे, गत दोन सार्वत्रिक निवडणूकांमध्ये निवडणूक विषयक गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या व्यक्तिंची यादी तयार करणे, निवडणूक विषयक गुन्ह्यांचा तपास गतिशील करणे, अवैध शस्त्र तस्करी, असामाजिक तत्वांना आळा घालण्यासाठी आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे, भारती नागरिक सुरक्षा अधिनियम २०२३ चे कलम १२६, १२७, १२८ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे, शस्त्र दारुगोळा यांच्या वाहतुकीबाबत दक्षतापूर्वक कडक तपासणी व खात्री करणे, मतदानाच्या तीन दिवस अगोदर व मतमोजणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार अथवा शस्त्र, दारुगोळा यांचाई वाहतुक होणार नाही याची खात्री करणे, जिल्हादंडाधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय आंतरराज्य शस्त्र व दारुगोळा वाहतुक होणार नाही याची खात्री करणे, मतदानाच्या दिवशी मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव, अडथळा येणार नाही यासाठी उपाययोजना राबविणे, निवडणूक घोषीत झाल्यापासून ते संपेपर्यंत मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांना कायदा सुव्यवस्था विषयक अहवाल दररोज पाठविणे, निवडणूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, मतदार यादी विषयक खोटे घोषणापत्र सादर करणे, निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे इ. उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande