‘दख्खनची राणी’ ९७ वर्षांची; पुणे स्थानकावर उत्साहात वाढदिवस साजरा
पुणे, 01 जून (हिं.स.)भारतीय रेल्वेच्या इतिहासातील मानाचे स्थान असलेली आणि पुणे-मुंबई शहरांना जोडणारी प्रसिद्ध ‘दख्खनची राणी’ अर्थात डेक्कन क्वीनने १ जून २०२६ रोजी आपल्या प्रवासाची ९७ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर विशेष कार्य
sdfg


पुणे, 01 जून (हिं.स.)भारतीय रेल्वेच्या इतिहासातील मानाचे स्थान असलेली आणि पुणे-मुंबई शहरांना जोडणारी प्रसिद्ध ‘दख्खनची राणी’ अर्थात डेक्कन क्वीनने १ जून २०२६ रोजी आपल्या प्रवासाची ९७ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून तिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.१ जून १९३० रोजी तत्कालीन ‘ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वे’ने सुरू केलेली डेक्कन क्वीन ही देशातील पहिली डिलक्स ट्रेन मानली जाते. सुरुवातीच्या काळात ‘ब्लू बर्ड बेबी’ या नावाने ओळखली जाणारी ही गाडी इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलेल्या डब्यांसह धावू लागली. प्रारंभी कल्याण-पुणे मार्गावर सुरू झालेला तिचा प्रवास पुढे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)पर्यंत विस्तारला गेला. कालांतराने दादर आणि शिवाजीनगरसह अन्य महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश करण्यात आला.देशात प्रथमच डायनिंग कारची सुविधा देणाऱ्या या गाडीने रेल्वे प्रवासाला नवे परिमाण दिले. १५ ऑगस्ट २०२१ पासून आकर्षक निसर्गदृश्यांचा आनंद घेण्यासाठी विस्टाडोम कोचची सुविधाही या गाडीला जोडण्यात आली.वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी फुलांनी सजवलेल्या इंजिनाला मानवंदना देण्यात आली. सकाळी ७.१५ वाजता डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना होताच उपस्थित रेल्वेप्रेमींनी तिचे उत्साहात स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande