
छत्रपती संभाजीनगर, 01 जून (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर म्हणाल्या विजय आपला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis