परभणी - शिवसेना उबाठाच्या वतीने डॉ. विवेक नावंदर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
परभणी, 01 जून (हिं.स.)परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डॉ. विवेक नावंदर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते खा.संजय जाधव साहेब, काँग्रेसचे राष्ट्रीय समन
Q


परभणी, 01 जून (हिं.स.)परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डॉ. विवेक नावंदर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते खा.संजय जाधव साहेब, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक सिद्धार्थजी हत्तीअंबिरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी साहेब, महापौर सय्यद इक्बाल, काँग्रेस शहराध्यक्ष रविराज देशमुख यांसह महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीची ही एकी आणि ताकद पाहता परभणी-हिंगोलीत डॉ. विवेक नावंदर यांचा विजय निश्चित आहे. जनतेच्या विकासाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, परभणी-हिंगोलीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण तयारीत आहे. सर्वपक्षीय मतदारांच्या भक्कम साथीने डॉ. विवेक नावंदर हे या निवडणुकीत विजय मिळवतील, यात शंका नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande