रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात आग, जीवितहानी नाही
रत्नागिरी, 1 जून (हिं.स.) । येथील शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध परकार रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आग
सरकार रुग्णालयात आग लागल्यानंतर रुग्णां तातडीने हलविण्यात आले


रत्नागिरी, 1 जून (हिं.स.) । येथील शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध परकार रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.

शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले. आगीने डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोण निर्माण झाल्याने डायलिसिस विभागातील अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले.

आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. रुग्णालयात ५१ रुग्ण दाखल आहेत त्यापैकी सात जण अतिदक्षता विभागात दाखल होते. तसेच दोघे रुग्ण डायलिसिसवर होते. या सर्व रुग्णांची अन्य रुग्णालयांमध्ये तातडीने व्यवस्था केल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. अलीमिया परकार यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले.

दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर ताबा मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर प्रयत्न करत होते. हा पूर्णपणे आटोक्यात आली असून आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. अतिथीव्र उन्हाळ्यामुळे शर्ट सर्किट झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande