आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी मंगळवारपासून विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण
परभणी, १ जून (हिं.स.) : राज्य शासनाच्या स्वायत्त अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाला २ जून २०२६ पासून सुरुवात होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी मंगळवारपासून विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण


परभणी, १ जून (हिं.स.) : राज्य शासनाच्या स्वायत्त अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाला २ जून २०२६ पासून सुरुवात होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा १० दिवसांचा निवासी प्रशिक्षण कोर्स राबविण्यात येत आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आज विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढत असून शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी तसेच सरकारी प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलट्सची मागणी वाढत असून युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

ही गरज लक्षात घेऊन अमृत संस्थेने ‘ड्रोन मिशन’ उपक्रम सुरू केला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना तांत्रिक कौशल्ये प्रदान करून त्यांना रोजगारक्षम बनविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

प्रशिक्षण कालावधीत सहभागी लाभार्थ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण मोफत व्यवस्था करण्यात आली असून त्यावरील सर्व खर्च अमृत संस्थेकडून उचलला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ मिळू शकणार आहे.

या प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल कार्यालयाजवळ, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande