जागृती शुगरला 'सर्वोत्तम तांत्रिक संचालन व नाविन्यपूर्ण कार्य' पुरस्कार
लातूर, 01 जून (हिं.स.) : जागृती शुगरला WISMA संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा सर्वोत्तम तांत्रिक संचालन व नाविन्यपूर्ण कार्य हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख तसेच जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे य
दिलीपराव देशमुख


लातूर, 01 जून (हिं.स.) : जागृती शुगरला WISMA संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा सर्वोत्तम तांत्रिक संचालन व नाविन्यपूर्ण कार्य हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख तसेच जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांचा रेणा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जागृती शुगरने साखर उद्योग क्षेत्रात तांत्रिक व्यवस्थापन, कार्यक्षमता वाढ आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला नवी प्रेरणा मिळणार असून साखर उद्योग क्षेत्रात अधिक गुणवत्तापूर्ण व आधुनिक कार्य करण्यासाठी बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.सत्कार समारंभात रेणा कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीपराव देशमुख आणि लक्ष्मणराव मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande