जळगावात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान; शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळेंनी भरला अर्ज
जळगाव, 01 जून (हिं.स.) जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर आता घरातूनच आव्हान उभे राहिले आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेना (शिंदे गट) पद
जळगावात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान; शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळेंनी भरला अर्ज


जळगाव, 01 जून (हिं.स.) जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर आता घरातूनच आव्हान उभे राहिले आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि पदाधिकारी दीपक धांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.महायुतीत जळगाव विधान परिषद जागा शिवसेनेला मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक शिवसैनिकांमध्ये होती. मात्र जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर नाराजीचा सूर उमटू लागला. अखेर या नाराजीचे रूप बंडखोरीत बदलले असून रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून थेट महायुतीलाच आव्हान दिले आहे सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्थानिक पातळीवर पक्षाला डावलण्यात आल्याची भावना व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर रेश्मा काळे आणि दीपक धांडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, रेश्मा काळे यांनी आजपर्यंत या जागेवर महिलेला उमेदवारी न दिल्याने मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीतील नेते नाराजांची समजूत काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा असून, अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी काही राजकीय घडामोडी घडतात का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande