परभणी-हिंगोलीतून महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल
परभणी, 01 जून (हिं.स.)। परभणी येथे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आज शिवसेना-महायुतीचे परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात दाखल करण्यात आला.
The candidature of the official candidate of Parbhani-Hingoli Legislative Council constituency, Mr. Saeed Khan, was filed in a very enthusiastic and celebratory atmosphere.


परभणी, 01 जून (हिं.स.)।

परभणी येथे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आज शिवसेना-महायुतीचे परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात दाखल करण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार संतोष बांगर, विधान परिषद सदस्य हेमंत पाटील तसेच शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या विकासाभिमुख विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची ताकद सोबत असल्याने मा. सईद खान यांचा विजय निश्चित असून परभणी-हिंगोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande