पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवीण पोटे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
अमरावती, 01 जून (हिं.स.)। अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलायावेळी पोटे यांनी
पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवीण पोटे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल


अमरावती, 01 जून (हिं.स.)।

अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलायावेळी पोटे यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले दरम्यान, अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख आणि भाजपचे प्रवीण पोटे यांच्यात थेट लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्या आहे जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज सादर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लाडके आणि लोकनेते जो विश्वास दाखवला, मला सलग तिसऱ्यांदा उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे.यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते उपस्थित होते.भाजप चा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल यात कुठलीही शंका नसल्याचे मत यावेळी भाजप आमदार,पदाधिकारी यांनी ucn सोबत बोलताना व्यक्त केले.अमरावती महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 11 जागांवर भाजप निवडणूक लढवत असून महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. अमरावतीत प्रवीण पोटे यांना प्रचंड बहुमत मिळून ते निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले. राणा दांपत्याच्या अनुपस्थितीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, सकाळी रवी राणा यांच्याशी चर्चा झाली असून रवी राणा व नवनीत राणा सध्या अमरावतीबाहेर आहेत. शहरात परतल्यानंतर ते चर्चा करतील आणि निवडणुकीत प्रवीण पोटे यांना मदत करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.माझा विश्वास आहे की, मी चांगल्या मतांनी या ठिकाणी अमरावतीमध्ये निवडून येणार आहे, ज्याच्यामध्ये मला कुठेही शंका राहिलेली नाही.आणि जेव्हा आम्ही २०१२ मध्ये निवडून आलो, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे त्यांनी मला संघटनेत सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर या ठिकाणी काम करण्याची संधी दिली असल्याची प्रतिक्रिया भाजपा उमेदवार प्रवीण पोटे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande