
- ९० टक्के कामे पूर्ण, ३५० स्वच्छता कर्मचाऱ्यांसह तीस कर्मचारी कार्यरत
लातूर, 01 जून (हिं.स.)।
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर ऐन पावसाळ्यामध्ये लातूरकरांना नाल्यांमध्ये पाणी तुंबणे, नाल्याच पाणी रस्त्यावर येणे अशा अडचणींना सामोरे जावू नये यासाठी युद्धपातळीवर मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे ३५० स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विविध ३० कामगारांच्यामाध्यमातून ही कामे होत आहेत. अद्यापर्यंत नालासफाईचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून पर्जन्यमान वाढले आहे. या पार्श्वभूमिवर मागील दोन वर्षांमध्ये पावसाळ्यामध्ये शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले, नाल्यांचे पाणी रस्त्यावर येणे या घडना समोर आल्या आहेत. दरम्यान, यंदा
लातूरकरांना सामना करावा लागू नये म्हणून दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये होणारे
मान्सूनपूर्व कामे हे यंदा एक महिना आधी म्हणजेच एप्रिलपासून सुरू
करण्यात आली आहेत. यामध्ये आतापर्यंत शहरातील विविध प्रभागांमधील ६९ मोठे आणि ८४ लहान नाल्यांची सफाई करण्यात आली आहे.
यामध्ये नाल्यांची सफाई करणे, नाल्यांमधील गाळ, अडकलेला कचरा काढणणे अशी कामे सुरू आहेत. यासाठी ६ जेसीबी, एक पोकलेन, ४ हायवा आणि १० ट्रॅक्टर या साधनांचा वापर करत स्वच्छता विभागाचे ३५० स्वच्छता कर्मचारी आणि इतर ३० कामगार हे काम करत आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हे अंतिम टप्प्यात आले असून ५ जूनपर्यंत उर्वरित १० मोठे आणि १४ लहान नाल्यांची सफाई होणार आहे. पावसाळ्यााआधीच ही कामे पूर्ण होणार असल्यामुळे यंदाचा पावसाळा लातूरकरांसाठी काही प्रमाणात का होईना पण मोठ्या अडचर्णीपासून दिलासा देणारा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis