पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्रे निश्चित
पुणे, 01 जून (हिं.स.)।महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी (३१ मे) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश असून त्यापैकी ४४१ पुरुष आणि ४२६ महिला मतदार आहेत, अशी माह
Vidhan parihsad


पुणे, 01 जून (हिं.स.)।महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी (३१ मे) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश असून त्यापैकी ४४१ पुरुष आणि ४२६ महिला मतदार आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, मंचर, राजगुरुनगर, शिरूर, दौंड, बारामती, सासवड, भोर, वडगाव मावळ आणि हडपसर येथे ही मतदान केंद्रे असणार आहेत.या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पात्र सदस्यांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, संबंधित नगरपालिका, नगरपंचायती तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणूक विभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.निवडणूक प्रशासनाने पात्र सदस्यांनी अंतिम मतदार यादीची पडताळणी करून आवश्यक माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande