सोलापूर : महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सोलापूर, 01 जून (हिं.स.) : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी महायुतीचे उमेदवार Rajendra Raut यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिं
sdfg


सोलापूर, 01 जून (हिं.स.) : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी महायुतीचे उमेदवार Rajendra Raut यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना जयकुमार गोरे, ज्योती वाघमारे , विजयकुमार देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले. या माध्यमातून महायुतीने निवडणुकीत आपली एकजूट अधोरेखित करत राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमागे भक्कम पाठिंबा असल्याचे संकेत दिले.

अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने सोलापुरात प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र दिसून आले.

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महायुतीने संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात प्रचार अधिक वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande