विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी – रामदास आठवले
पुणे, 01 जून (हिं.स.) हातभट्टीची गावठी दारू अत्यंत घातक असून अशा अवैध दारूचे उत्पादन व विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुणे आणि पिंपरी-च
ram


पुणे, 01 जून (हिं.स.) हातभट्टीची गावठी दारू अत्यंत घातक असून अशा अवैध दारूचे उत्पादन व विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात रसायनमिश्रित विषारी दारूचे सेवन केल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक नीलेश आल्हाट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये आणि महापालिकेकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. तसेच मृतांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली असून, त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.विषारी दारू दुर्घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात व्यापक आणि प्रभावी मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही आठवले यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande