कर्जत आगारात एसटीचा ७८ वा वर्धापनदिन उत्साहात
रायगड, १ जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्जत बस आगारात सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्मचारी, प्रवासी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत एसटीच्या गौरवशाल
Salute-to-Lalparis-78-year-jo


Salute-to-Lalparis-78-year-jo


रायगड, १ जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्जत बस आगारात सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्मचारी, प्रवासी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत एसटीच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान करण्यात आला.

पुणे ते अहमदनगर दरम्यान १ जून १९४८ रोजी पहिली एसटी बस धावली होती. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात एसटीच्या सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रेश्मा महेश खडे यांनी एसटी प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करताना कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात एसटीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी एसटीच्या सुवर्णकाळातील आठवणींना उजाळा देत जुन्या प्रवास संस्कृतीचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. तर महेश खडे यांनी कर्मचारी वर्गाच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी संघामार्फत विकसित करण्यात आलेल्या विशेष लिंकची माहिती देत ती कर्मचाऱ्यांसोबत शेअर केली.

यावेळी आगार व्यवस्थापक देवानंद मोरे यांच्यासह महादेव पालवे, संजय कोंडार, विलास बागुल, अरुण थोराड, अनुजा सुरावकर, संगीता शिरगिरे, मेघा कालवणकर, संतोष फराट तसेच अन्य कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आत्माराम देशमुख यांनी प्रभावी आणि मुद्देसूद पद्धतीने केले. कार्यक्रमामुळे एसटीच्या समृद्ध परंपरेचा गौरव होऊन कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande