शायना एन. सी. शिवसेनेच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी
मुंबई, 01 जून (हिं.स.) : शिवसेनेतर्फे सौ. शायना एन. सी. यांची पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असून, 1 मे 2026 पासून एका वर्षासाठ
शायना एनसी


मुंबई, 01 जून (हिं.स.) : शिवसेनेतर्फे सौ. शायना एन. सी. यांची पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असून, 1 मे 2026 पासून एका वर्षासाठी लागू राहील. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande