
परभणी, 01 जून (हिं.स.)।
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सईद भैय्या खान यांना केवळ शिवसैनिक आणि जनसामान्यांचाच नव्हे, तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून सईद भैय्या खान यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल घेत विविध स्तरांतील नागरिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कौतुक व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावरही त्यांच्या कार्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी मिळाल्यास सर्वसामान्य, अल्पसंख्याक तसेच तळागाळातील मतदारांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे होईल, अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
“काम करणाऱ्या नेतृत्वाला पक्षांच्या सीमा नसतात; जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हेच त्यांचे खरे बळ असते.” अशी भावना सईद भैय्या खान यांच्या कार्याबाबत व्यक्त होताना दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis